bsppune12@gmail.com 98 50 887 071

President

Responsive Image

पक्षप्रमुख -

मायावती (जन्म: मायावती प्रभुदास; १५ जानेवारी, इ.स. १९५६) ह्या भारतीय हिंदी भाषक राजकारणी व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आहेत. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. २००७ सालातील निवडणुकीमध्ये २/३ बहुमत मिळून त्यांनी उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि चौर वेळा उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सांभाळली. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

जीवन -

मायावतींचा जन्म दिल्लीतील लेडी हार्डिंग (सध्याचे श्रीमती सुचेता कृपलानी) इस्पितळात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभुदास आणि आईचे नाव रामरती होते. मायावती या उत्तर प्रदेशातल्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर गांवाच्या मूळ निवासी आहेत. त्या बी.ए., बी.एड. व एल.एल.बी.आहेत. आपल्या कार्यदक्षता व क्षमतेच्या बळावर त्यांना ‘आयर्न लेडी’ (पोलादी स्त्री) व ‘आयकॅानिक वुमन’ (आदर्श स्त्री) असल्याची ख्याती मिळवली. मायावती अविवाहित आहेत.

राजकारणात प्रवेश -

१९७७ मध्ये कांशीराम यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ राजकारणी होण्याचा निर्णय घेतला. १९८४ साली बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली तेव्हा कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली ते त्यांच्या कोअर टीमचा भाग होते.

राजकीय जीवन -

  • १९८९: बिजनोर लोकसभा (एसयू) उत्तर प्रदेशातून खासदार म्हणून निवडून आले.
  • १९९४: उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले.
  • १९९५: उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
  • उत्तर प्रदेशच्या राजकारणात मायावती मजबूत आधारस्तंभ आहेत. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदाचा कामाचा कालावधी खालीलप्रमाणे होता.
  • ३ जून १९९५–१८ ऑक्टोबर १९९५
  • २१ मार्च १९९७–२० सप्टेंबर १९९७
  • मे ३, २००२-ऑगस्ट २६, २००३
  • १३ मे २००७–६ मार्च २०१२.